भोर नगरपरिषदेच्या वतीने ध्रुव प्रतिष्ठानचे राजीव केळकर यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार.
भोर शहर (प्रतिनिधी)
भोर नगरपरिषद ,भोर यांच्या वतीने ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भोर तालुक्याचे आदर्श समाजसेवक राजीव केळकर यांना "कोव्हीड योद्धा" हा पुरस्कार देण्यात आला.
संपूर्ण जग एकजूट होऊन कोरोना महामारीशी लढत असताना अशा कठीण परिस्थितीत समाजाची सेवा उदात्त भावनेने केली.ध्रुव प्रतिष्ठानचा आदर्श खरोखरच अनुकरणीय असून प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. राजू केळकर यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल, भोर नगरपरिषद भोर यांच्या वतीने ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांना कोव्हीड योद्धा हा पुरस्कार देऊन भोर नगर परिषद भोर यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या वेळेस भोर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजयकुमार थोरात व भोर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे, भोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.

